कर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेड मधून उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे तगडे आव्हान असणार आहे. मात्र या दोघांच्या विरोधात राम शिंदे यांचे निकटवर्तीय नामदेव राऊत अपक्ष उभा राहिल्यास रोहित पवार यांचा मार्ग सुखकर होऊ शकतो.

नामदेव राऊत हे राम शिंदे यांचे समर्थक आहेत. मात्र प्रत्येक विधानसभा निडणुकीला ते राम शिंदेंना आव्हान देण्याच्या तयारीत असतात. यावेळी देखील ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. नामदेव राऊत हे कर्जतचे माजी नगराध्यक्ष आहेत. तसेच त्यांना तालुक्यता मानणारा होता वर्ग आहे. त्यामुळेच आजवर त्यांच्या आव्हानाला राम शिंदेस यांनी कुचकामी ठरवले नाही. प्रत्येक वेळी त्यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे. यावेळी देखील दोघांमध्ये असा तह होण्याची शक्यता आहे.

दरम्यान नामदेव राऊत यांनी यावेळी माघार नाही असा नारा देत उद्या सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. नामदेव राऊत यांनी उमेदवारी केल्यास राम शिंदे आणि नामदेव राऊत यांच्यात मतांचे विभाजन होऊन रोहित पवार विजयाकडे आघाडी घेण्याची शक्यता आहे. तर राम शिंदे देखील सर्व धोक्यांना ओळखून आहेत. ते देखील ऐन निवडणुकीत आपला करिष्मा दाखवून आपली मुसद्दी सिद्ध करू शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment