कायद्याच्या जागरूकतेसाठी मोफत कायदेशीर सल्ला शिबीर संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : तालुक्यातील कापील या गावी मोफत कायदेशीर सल्ला शिबीर संपन्न झाले. कायदादूत ग्रुप व कराड तालुका सेवा प्राधिकरण मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात माहिती अधिकार,शेतीच्या सात बाऱ्या संबंधी नियम, लोक न्यायालय, वाहतुकीचे नियम यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत यावर काळजी व्यक्त करत पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याचे सरोदे यांनी आवाहन केले. लोकांचे कायद्याबाबतचे अज्ञान दूर करण्यासाठी क्लिष्ट कायदा व सामान्य लोक यांतील दरी कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराची गरज असल्याचे मत सरोदे यांनी व्यक्त केले.

कायदादूत ग्रूपच्या  ॲड स्नेहल जाधव व अद्वैत देशपांडे
तसेच कराड तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सरकारी वकील  नितीन होळकुंडे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड सी. बी. कदम, ॲड पी. एन. पाटील, ॲड स्वाती जाधव, ॲड बी. बी. जाधव, ॲड ए. टी. मदने, ॲड सागर पाटील उपस्थित होते.


Leave a Comment