काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात ९ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

0
36
gang rape
gang rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सावत्र आईच्या सांगण्यावरुन सावत्र भावानेच मित्रांसोबत केले पाशवी कृत्य

बारामुल्ला, काश्मीर | येथील उरी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेच्या तपसाअंती २४ ऑगस्टला बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या सावत्र आईच्या सांगण्यावरुनच सावत्र भावाने त्याच्या मित्रांसाहित हे पाशवी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळा दाबून मारल्यानंतर ओळख पटू नये म्हणून चाकूने त्या मुलीचे डोळेही काढून टाकण्याची क्रूरता या नराधमांनी केली आहे. या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपासासाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे.

बोनियार पोलीस स्टेशनमध्ये २४ ऑगस्टला मुलगी हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. गावकऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावदेखील केला होता. २ सप्टेंबरला मुलीच्या गावातील घरापासून १ किलोमीटर अंतरावर हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. पीडित मुलीच्या वडिलांना २ बायका आहेत. यापैकी एक फहमीदा, ही त्याच गावात राहत असून, दुसरी खुशबू ही झारखंडची आहे. फहमीदा बाहेरची कामे व शेळीपालन करते तर खुशबू घरकामात असते. खुशबू हीच त्या पीडित मुलीची आई आहे. आपल्या सवतीबाबत असलेल्या आकसामुळे,नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोप्रति असलेल्या अधिक जवळीकतेमुळे आपण हे कृत्य केल्याचं फहमीदाने सांगितलं. आपला मुलगा साहिलला तिने हे कृत्य करायला सांगितलं. आणि खुनानंतर त्यावर ऍसिड सुद्धा टाकण्यात आलं. या घटनेचा अधिक तपास उरी पोलीस स्टेशनचे मेहरजुद्दीन रैना व इकबाल अहमद करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here