कोरोनामुळं मृत्यू झालेल्या कोविड योध्यांना शहिदांचा दर्जा द्या- रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या संकटकाळात समाजाच्या रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे आणि अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व कोरोनायोद्धे आहेत. त्यामुळं कोरोना विरुद्ध लढताना या योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

कोरोनाविरुद्ध लढताना मृत्यू झालेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला अनुकम्पा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीबाबतचं पत्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पत्रात राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना देशातील डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, नर्स हे आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. अशावेळी त्यांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्यास त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी मदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment