Saturday, March 25, 2023

खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूरात साडेतीन हजार वकिलांच आंदोलन

- Advertisement -

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : कोल्हापूरात उच्च न्यायालयाच खंडपीठ व्हावं या मागणीसाठी वकिलांनी आंदोलन सुरू केल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार वकिलांनी एक दिवस कामावर बहिष्कार टाकत आज सकाळ पासून आंदोलन सुरू केल आहे. जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही फार जुनी मागणी आहे. सध्या राज्यात नागपूर आणि औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत.

- Advertisement -