खूप राग येतोय ?? चला पाहूया रागाला नियंत्रित ठेवण्याचे काही उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा राग येतो अगदी लहान मुलांसपासून ते मोठया लोकांपर्यत सर्वाना राग येतो. पण राग व्यक्त करण्याची एक कला आहे आणि हि कला ज्या लोकांना अवगत आहे. ते लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. राग येण्याची अनेक कारणे आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेक जन हायपर होतात. त्याच्यासाठी पण ते चांगली गोष्ट नसते. ज्या वेळी लोक जास्त हायपर होतात. त्यावेळी त्याचे आपोआप ब्लड प्रेशर वाढते. त्यामुळे हृदयाचा त्रास होण्यास सुरुवात होते.

काय आहेत उपाय

जेव्हा राग अनावर होतो त्यावेळी चक्क आपण लहान मुलासारखे शांत राहून १ ते १० अंक मोजण्याचे प्रयत्न करावेत. त्यामुळे आपला राग शांत होण्यास मदत होते. अश्या वेळी खूप कमी बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर प्रचंड राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी कोणत्याही पद्धतीची सल्लामसलत करत बसू नये. आणि आपले म्हणणे त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्याशी नजर मिळवू नका. त्याला तू किती चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. आणि मनात १० पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा. बघा तुमचा राग शांत होतो. एक छान ब्रेक घ्या . त्या अनुषंगाने निवांत ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. समोरचा जर चर्चा करण्यास तयार असेल तर त्याच्याबरोबर चर्चा करा. नाहीतर विषय तेथेच सोडून द्या. त्याला भेटणे वगैरे टाळा.

कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो . महिलांना जास्तीत जास्त झोप मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा महिला राग कोणावर हि काढायचा प्रयत्न करतात. त्यावेळी काहीच काम न करता शांत झोपणे हा त्याच्यावर एक उपाय आहे. प्राणायाम मुळे सुद्धा राग जाण्यास
मदत होऊ शकते. प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like