गोरेगावच्या गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी | हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावमध्ये युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पाच सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील नवतरुणांसह नागरिकांनी शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळात विविध धार्मिक , सांस्कृतिक तथा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा गणेश उत्सव साजरा होत असताना गोरेगाव येथील शिव चौकातील युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी स्थानिक नागरिकांसह परिसरातील सर्वधर्मीय नवतरुणांनी रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवित रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment