Saturday, March 25, 2023

‘ग्यारा पत्ती’ जंगलात नक्षलवादी , पोलिसांमध्ये चकमक

- Advertisement -

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यामधील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात आज पहाटे पोलिसांच्या ‘सी- ६०’ पथकातील जवानांशी नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये पोलिसांना दोन नक्षलवादी ठार करण्यात यश आले.

‘सी- ६०’ पथकाचे जवान ग्यारा पत्ती जंगलात कालपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. दरम्यान, आज पहाटे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह व काही साहित्य आढळून आले.” पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चकमकीनंतर संबंधित चकमकी बाबत माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांकडून नक्षली अभियान अजून तीव्र करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी आणि पोलीस यांच्यामध्ये वारंवार चकमकी घडत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. याचेच पडसाद म्हणून काल हि चकमक घडल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने पोलिसांना यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र अजून काही चकमकी घडण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.