Saturday, March 25, 2023

तब्बल दोन लाख 78 हजार नवसाच्या मोदकांचे वाटप

- Advertisement -

हिंगोली प्रतिनिधी | नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात ज्याची ख्याती आहे अशा हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रीघ लागली आहे. सकाळी भाविकांसाठी महापूजा झाल्यानंतर मंदिर खुले करण्यात आले.

विशेष म्हणजे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवसाच्या मोदकांचे वाटप करण्यात येते. तब्बल दोन लाख 78 हजार मोदक भाविकांना वाटप करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने तयार केले आहेत.

- Advertisement -

तसेच लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगोली शहरातील नागरिकांनी जागोजागी फराळाची व्यवस्था केलेली आहे. पावसाचे वातावरण असल्याने मंदिर समितीने वॉटरप्रूफ मंदिराची देखील उभारणी केली आहे.