Thursday, March 30, 2023

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी पंपासाठी १० हजार परवाने देणार आहे. त्यामुळे सीएनजी पंप सुरु करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याबद्दलच जाणून घेऊया 

सीएनजी पंप सुरु करण्यासाठी कंपन्या जमिनीची मागणी करतात, कंपन्या जमिनी घाणवट (लीज) घेतात. त्यामुळे जमिनी लीज वर देण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता.  किंवा तुम्ही स्वतः देखील डीलरशिप घेऊ शकता. यासाठी कंपन्या  पार्टनरशिप करतात. ज्याला त्या लैंडलिंक सीएनजी स्टेशन पॉलिसी म्हणतात. कंपन्या आपल्या गरजेनुसार   स्टेशन साठी टेंडर  काढतात.  ज्यामध्ये लोकेशन सहित दूसरी रिक्वॉयरमेंट दिली जाते.  या आधारावर तुम्ही अर्ज करू शकता. या कंपन्यांच्या वेबसाइटवर याची माहिती मिळते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी नुकतेच छोटे स्टार्ट-अप मोठ्या ऑइल अँड मार्केटिंग कंपन्यासोबत टाय-अप करून  रिलॅक्सेशन पॉलिसीच्या आधारावर सूट  मिळवू शकतात असे सांगितले आहे. यासोबतच कोण्या परदेशी कंपन्यांना गुंतवणूक करायची असेल तर त्याही करू शकतात असेही म्हणाले. 

- Advertisement -

जर तुमच्याकडे जमीन नसेल तर जमीन मालकाकडून तुम्हाला एनओसी सर्टिफिकेट घ्यावे लागते. आपल्या कुटुंबातील सदस्यांची जमीन घेऊनही तुम्ही सीएनजी पंपासाठी अर्ज करू शकता. यासाठी देखील तुम्हाला एक एनओसी आणि ऍफिडेव्हिट बनवावे लागेल.  या पंपासाठीचा खर्च वेगवगळ्या कंपन्यांवर आधारित असतो. तसेच पंप तुम्ही शहरात, हायवे वर किंवा कुठे सुरु करणार आहात यावरही खर्च अवलंबून असतो. तुमची स्वतःची जमीन असेल तर ५० लाखांपर्यंतचा खर्च येतो. हलक्या वाहनांसाठी ७०० वर्गमीटरची जमीन असायला हवी. ज्यामध्ये पुढच्या बाजूला २५ मीटर  पाहिजे.  याप्रकारेच जड कमर्शियल वाहनांसाठी सीएनजी पंप उघडणार आहात तर १५०० ते १६०० वर्गमीटर प्लॉट असला पाहिजे. ज्यामध्ये समोरच्या बाजूला ५०-६० मीटर असणे गरजेचे आहे. 
   

इंद्रप्रस्थ गॅस  लिमिटेड, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन, महानगर गैस लिमिटेड, महानगर नेचुरल गैस लिमिटेड, महाराष्ट्र नेचुरल गैस लिमिटेड, गुजरात स्टेट पेट्रोलियम प्राइवेट लिमिटेड या कंपन्या सीएनजी डिलरशिप देतात. सीएनजी पंप ची डिलरशिप देणाऱ्या या कंपन्यांच्या वेबसाईट वर जाऊन तिथे दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठी १० वी उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक असते. याबाबतीतील जाहिराती कंपन्या वेळोवेळी देत असतात. अर्जासाठी आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता जिथे प्लॉट असणार आहे तेथील जागा, जागेचा पत्ता, प्लॉट चा आकार, जमिनीची कागदपत्रे, प्लॉट विजेची आणि पाण्याची सोया आहे की नाही, जमिनीवर किती झाडे आहेत ही माहिती द्यावी लागते.  

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.