Wednesday, February 8, 2023

त्या व्यक्तीच्या संपर्कातील इतरांच्या तपासण्या निगेटीव्ह

- Advertisement -

ठाणे प्रतिनिधी | ठाण्यात कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर तीनही व्यक्तीच्या टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. अशी माहिती ठाणो महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी अनिरुध्द माळगांवकर यांनी दिली. मागील आठवड्यात ठाण्यात फ्रान्सवरुन एक व्यक्ती दाखल झाली होती.

त्याची कोरोना तपासणी पॉजिटीव्ह आली आहे. सध्या त्याच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर तीन व्यक्तींचीही कोरोना तपासणी करण्यात आली असता. ती निगेटिव्ह आली आहे. दरम्यान ठाणो महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागील काही दिवसात परदेशवारी करून आलेल्या व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

यात आतार्पयत 70 प्रवाश्यांची आणि 13 त्यांच्या संपर्कात आलेले अशा 83 लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्या फ्रांसहून हुन परतलेल्या व्यक्तीचा अपवाद वगळता इतर सर्वांच्या तपासण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान ज्या व्यक्तीची कोरोना तपासणी पॉजिटीव्ह आली होती. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे एक हजार घरांचा सव्र्हे सुरक्षेचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही त्यातील एकाही व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणो आढळली नसल्याची माहिती माळगांवकर यांनी दिली.