दहावीत तब्बल 4 वेळा नापास झालेला हा खेळाडू आयपीएल मध्ये छाप पाडण्यास सज्ज ; पहा कोण आहे का युवा खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 ची सुरुवात उद्यापासून होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. असाच एक युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. राजस्थानचा लोकल बॉय आकाश सिंहला गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात 20 लाखांना विकत घेतले.

मुळचा भारतपूरचा असलेला डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज आकाश सिंह क्रिकेट खेळण्यासाठी जयपूरकडे वळला. अरावली क्रिकेट अकादमीमध्ये विवेक यादव यांच्या देखरेखीखाली आकाशनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. जवळपास 5 वर्षे या अकादमीमध्ये आकाश क्रिकेट खेळत होता.

दहावीत झाला होता तब्बल चार वेळा नापास

क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करणारे खेळाडू शक्यतो अभ्यासात जास्त हुशार नसतात. आकाश सुद्धा असाच आहे. आकाश सिंहला आयपीएलनं मालामाल केले असले तरी त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळंच स्थानिक क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करणारा आकाश सिंह सलग चारवेळा दहावीच्या परिक्षेत नापास झाला. आता हाच आकाश सिंह आयपीएलमध्ये दिग्गजांबरोबर खेळण्यास सज्ज आहे.

आकाशने 2017मध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत एका सामन्यात एकही धाव न देता 10 विकेट घेतल्या होत्या. यानंतर राजस्थानची अंडर -16, अंडर -19, अंडर -23 आणि ज्येष्ठ संघात निवड झाली. प्रत्येक प्रकारात सातत्याने चमकदार कामगिरी करून तो यशाची शिखरं गाठत गेला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like