दिलासादायक!! कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची वाढ होत आहे. असं असलं तरी दुसरीकडे एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. देशातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे.

देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ५३ लाखांचा टप्पा पार केला आहे. जगभरातील एकूण करोनाबाधितांपैकी १७ टक्के रुग्ण हे भारतात आहे. परंतु यापैकी ४२ लाख रूग्ण करोनामुक्त झाले आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट हा ७९.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं याचं श्रेय केंद्र सरकारला देत रणनीती, ठोस उपाययोजनांसाठी चाचण्या, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांची ओळख यामुळेंच हे शक्य झालं असं म्हणल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like