नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचे खडसेंना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना आवाहन करताना म्हणले आहे की नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा.

“एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असे व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

काय होता एकनाथ खडसेंचा आरोप –
“जे काही कटकारस्थान रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनीच रचले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काय काय उद्योग केले ते मला माहिती आहेत. मी पक्षाच्या विरोधात भाषा केली नाही. मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like