परभणीत अवैधरित्या शस्त्र विकणाऱ्या औरंगाबादमधील चौघांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
सय्यद शहा तुराबूल हक्क उर्स परिसरात धारदार शस्त्र विकणाऱ्या टोळीवर छापा टाकत परभणी पोलिसांनी औरंगाबाद येथील चौघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला शस्त्रसाठ्यासह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे .

तुराबुल हक्क दर्गा यात्रेमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठया प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो. अवैध धंद्यांची माहिती काढत कारवाई ही ही करण्यात येत असते. सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी विशेष पथकाचे पोलीस अधिकारी कर्मचारी ऊर्स दर्गा परिसरात पेट्रोलिंग करत असतांना, दर्गा परिसरातील मुख्य कमानीच्या बाजूस प्लॉस्टिकची ताडपत्री लावून जनरल स्टोअर्स दुकानातून काही इसम तिक्ष्ण शस्त्र चोरुन विक्री करत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने, पथकाने या ठिकाणी सापळा रचून छापा मारला. सदर पथकास या ठिकाणी शेख अजिम शेख अकबर वय ३० वर्ष रा . बिल्किस मशिद जवळ मकसुद कॉलनी रोशन गेट औरंगाबाद , शेख रहिम शेख अकबर वय २८ वर्ष रा.विल्किस मशिद जवळ मकसूद कॉलनी रोशन गेट औरंगाबाद, सय्यद फेरोज सय्यद रजाक वय २२ वर्ष रा.मिसळवाडी औरंगाबाद ता . जि . औरंगाबाद व सलमान पठाण फय्याज पठाण वय २३ वर्ष रा . मिसळवाडी इब्राहिम कॉलनी औरंगाबाद हे चार जण मिळून आले.

त्यांच्या जवळून अवैधरित्या विक्रीस आणलेल्या ५ गुप्त्या, एक मोठा लोखंडी खंजिर, ५ लहान लोखंडी खंजिर, फायटर सारखे साचे असलेले ८ लहान खंजिर,एक मोठा लोखंडी चाकू, दोन लहान लोखंडी चाकू व आठ धारदार चाकू असे एकुण ३० तिक्ष्ण धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. उर्स यात्रेमध्ये चोरटी व ज्यादा भावाने विक्री करण्यासाठी ही शस्त्रे आणण्यात आल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आरोपीकडूंन हत्यार विक्री करून जमा झालेली रोख रक्कम ११,३३० हजार रुपये, दोन मोबाईल हॅन्डसेट ज्यांची किंमती १५००० हजार रुपये आहे. असा एकुण ३६ ३३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील प्रकरणी नमुद चार आरोपीना पोलीस ठाणे कोतवाली येथे मुद्देमालासह हजर करुन बेकायदा शस्त्र कायदा तसेच भा. दं .वि.कलमा प्रमाणे पो.हे.कॉ जगदीश रेडडी यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस ठाणे कोतवाली करीत आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक राग सुधा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनि हनुमंत पांचाळ, सपोउपनि हनुमान कच्छवे, पोह सखाराम टेकुळे, जगदीश रेडडी, पो.कॉ श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, मपोशि पुजा भोरगे, चालक गजेंन्द्र चव्हाण यांनी केली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment