पर्यटकांचे आकर्षण असणारी माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माथेरान : पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ही शटल सेवा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. अमन लॉज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनची घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली आणि ट्रेन सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. नववर्षाच्या स्वागतालाच ट्रेन सुरु झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

जानेवारी ते मे २०१६ मध्ये मिनी ट्रेनचे डबे घसरण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली होती. पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळल्यामुळे मिनी ट्रेन चालवण्यास अनेक अडथळे निर्माण होत आले आहेत. अखेर चाचणी यशस्वी ठरल्यामुळे मिनी ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक या मिनी ट्रेनला चांगला प्रतिसाद देतील.

 

Leave a Comment