पावसाळ्यात घ्या ‘या’ गोष्टींची काळजी आणि रहा पूर्णपणे निरोगी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । या वर्षीच्या पावसाळा सोबत कोरोनाचे सुद्धा संकट आले आहे. त्यामुळे एकासोबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्दी , खोकला, ताप असे आजार सभोवताली आहेतच. कोव्हिड- १९ अर्थात करोना हा नवा विषाणू आपल्या अवती भवती आहे. कोरोनाचे औषध हे सापडण्यासाठी सर्व स्तरावर विशेष प्रयत्न सुरु आहेत.मुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येकाने अधिक काळजीपूर्वक स्वत:ला जपणे गरजेचे आहे. त्यामुळे या वर्षी आपली आणि आपल्या मुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजाची घ्यावी. त्यामुळे सावध राहणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा मोह टाळणे, आजारी माणसापासून अंतर ठेवून वावरणे आणि शक्यतो पावसात भिजण्याचा मोह टाळणे, हाच आरोग्य मंत्र जपला पाहिजे. यावर्षी साधी शिंक, सर्दी-ताप-खोकला जरी आला तरी तुम्ही करोना संशयित म्हणून ओळखले जाऊ शकता.

दरवर्षी प्रमाणे पावसाळा आला की रुग्णांच्या संख्येत वाढ होते. अनेक दवाखाने हाउसफुल्ल होतात. रोगराई पसरते. त्याला कारणे अनेक असली तरी स्वच्छता हाच त्यावर मुख्य प्रतिबंधक उपाय आहे. असे अनेक तज्ञाचे मत आहे. परिसरात कचरा व पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतल्यास मलेरिया व डेंग्यूच्या डासांची निर्मिती होणार नाही व रोगराईला आळा बसेल. स्वच्छता राखणे जास्त महत्वाचे आहे. अनेक वेळा पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांची लागण होते. शकतो हा आजार हवामानातील बदलामुळे निर्माण होतो. डासांची उत्पत्ती झाल्याने हिवताप सारखा रोग होतो. तसेच हिवतापाच्या या दिवसांमध्ये रुग्णांमध्येही वाढ मोठ्या प्रमाणात होते.

पावसाळ्यातील कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी

–लहान मुलांची खेळणी आठवड्यातून एकदा निर्जंतूक करा.

–घराभोवतालच्या कुंड्यांची सफाई करा. घरात झाडे लावू नका. यात पाणी साठून डासांची पैदास वाढते.

–पिंपामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये साठवणूक केलेले पाणी एका दिवसावर साठवू नका. त्यात डास वाढतात.

–केरकचरा, सांडपाणी, मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावा.

–उघड्यावरील पदार्थ टाळा. अन्नपदार्थ झाकून ठेवा.

–दूध, पाणी उकळून प्या.

–बाळाची शी धुतल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

–फळभाज्या,पालेभाज्या वापरण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घ्या.

–घर, परिसर स्वच्छ ठेवा. घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवा.

–हात स्वच्छ धुतल्याशिवाय पदार्थ खाऊ नये. नासलेले किंवा शिळे अन्न खाऊ नका.

–भांडी, कपडे ओलसर ठेवू नका.

–स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ व निर्जंतूक करून घ्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like