पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये गणेशोत्सव, काश्मिरी तरूणांचा पुण्यात संकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर आणि पुण्याचं नातं दृढ व्हावं यादृष्टीने पुणे काश्मिरी सांस्कृतिक कला केंद्र यांच्या वतीने कसबा पुणे गणपती याच्या अंतर्गत आज पुण्यातील विंचूरकरवाड्यात एकत्र आले होते. विंचूरकरवाड्यात शहरातील काश्मिरी मंडळी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले.

ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मूर्ती विराजमान झाली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सरदार विंचूरकर यांचे दहावे वंशज नारायणराव विंचूरकर, दीक्षाजी कुलरिया, शिवसेना नेते शाम देशपांडे, पराग ठाकूर आणि हेमंत जाधव उपस्थित होते. कार्यक्रमात जम्मू काश्मीर येथील काही तरूण आणि तरुणींशी यावेळी संवाद साधण्यात आला.

दरम्यान ,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनुच्छेद ३७० हटवलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी पायाभूत सुविधा होतील आणि आमच्यासारखे विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात. ती वेळ आता तेथील तरुण आणि तरूणींवर येणार नाही. तसेच आम्ही सर्वांनी खूप सहन केले” अशी भावना काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment