पुण्यात साकारला कलम ३७० वर आधारित देखावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#गणेशोउत्सव२०१९ | पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर त्यावर आधारित देखावा शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी साकारला आहे. त्या देखाव्याला ‘कलम 370 हटवल्यानंतरचा भारत’ असे नाव देण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत देशातील प्रत्येक नागरिकाने केले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय तांबोळी यांनी ‘कलम ३७० हटविल्यानंतरचा भारत’ असा देखावा साकारला आहे.

या देखाव्यात जम्मू आणि काश्मीर येथील चौकात लाल ध्वज 370 कलम असताना फडकत होता आणि आता हेच कलम हटविल्यानंतर त्याच चौकात तिरंगा दिमाखात फडकविताना दाखविण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी उंचच उंच इमारती, कंपन्या त्या ठिकाणी कामाला जाणारे नागरिक, जन जीवन पूर्वपदावर आलेले असल्याचा देखावा साकारण्यात आला आहे.

Leave a Comment