Saturday, March 25, 2023

‘बजेट’ महाराष्ट्राचा२०२०: राज्याच्या आरोग्यासाठी सरकारनं दिला ‘इतका निधी’

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी घोषणा केली.

तसंच डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढवून नवीन महाविद्यालये सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी माहिती दिली. नव्या रूग्णवाहिकांसाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करणार. २० नवी डायलिसिस सेंटर सुरू करणार. तसंच ९९६ प्रकारचे उपचार मोफत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.