Thursday, March 30, 2023

भाजपमधील दुर्योधन आणि दुशासन सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंग; भाजपचे माजी नेते यशवंतराव सिन्हा यांचे टीकास्त्र

- Advertisement -

नवी दिल्ली, टीम, हॅलो महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या तुकडे तुकडे गॅंगच्या विधानावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘दुर्योधन आणि दुशासन हे या भारतातील सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंगचे दोनच लोक आहेत. हे दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यांच्यापासून सावध राहा’.

 

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात होणाऱ्या निदर्शनेतील हिंसाचारासाठी विरोधी पक्षांना लक्ष्य केले होते. गुरुवारी एका कार्यक्रमात अमित शहा म्हणाले, ‘अशांततेसाठी जबाबदार असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात विघटन करणार्‍या टोळीला शिक्षा करण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या लोकांनी त्यांना शिक्षा करावी ‘

अमित शहा यांच्या या विधानावर माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाभारतातील दुर्योधन आणि दुशासनाची उपमा दिली आहे.