भारत-चीन सीमेवर गोळीबार: चीननं केला भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा आरोप

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापती मात्र सुरूच आहे. अशातच सोमवारी रात्री भारतीय जवानांनी सीमा पार करत गोळीबार केला असल्याचा आरोप चीननं केला आहे. लडाखच्या पँगाँग सो नजीक असलेल्या एका पर्वतावर ही चकमक झाल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, चीनी सैनिक भारतीय जमिनीवर कब्जा करण्याच्या हेतूने गलवानसारखी हिंसक घटना घडवू इच्छित होते आणि म्हणूनच भारतीय सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला, असे भारतीय सूत्रांचे म्हणणे आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या पूर्वी लडाखमध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, भारतीय सेनेने या घुसघोरांना सडेतोड उत्तर दिलं. पँगाँगच्या नदी पात्राच्या दक्षिणी भागात शेनपाओ डोंगराळ भागात ही घटना घडली. पँगाँग नदी पात्राच्या दक्षिणी किनाऱ्यावर चीनने घुसघोरीचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा मनसुबा भारतीय सैनिकांनी हानून पाडला. भारतीय सैनिकांनी वॉर्निंग फायरिंग करून चीनच्या सैनिकांना तिथेच रोखलं.

चीनने आता उल्टा आरोप भारतावर लावला आहे की, त्यांनी चीनला उकसवलं आहे. चीनने भारतीय सेनेवर LAC पार करण्याचा आरोप केला आहे. चीनचा असा आरोप आहे की, भारतीय सेनेने LAC वर चीन सैनिकांनी उकसावण्याचा प्रयत्न केला आणि चीन सैनिकांवर गोळीबार देखील केला. लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) वर पूर्वी लडाख परिसरात चीनी सेनाने फायरिंग केलं. सोमवारी रात्री हा गोळीबार भारतीय चौकीच्या दिशेने करण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने फायरींग करून चीनला समज दिली.

भारतीय जवानांच्या कारवाईने चीन का संतापला?
भारतीय जवानांनी चुशूल सेक्टरमध्ये २९ आणि ३० ऑगस्टला पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापासून ते रिचिन ला पर्यंत सर्व उंच टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. याच भागामध्ये सन १९६२ मध्ये भारत आणि चीनदरम्यान युद्ध झाले होते. भारतीय जवानांनी ताबा मिळवलेल्या भागाला ग्रे झोन असे म्हटले जाते. या भागावर दोन्ही देश आपला दावा करत आहेत. आतापर्यंत या भागावर कोणाचाही ताबा नव्हता. भारतीय जवानांनी आता या टेकड्यांवर आपला ताबा मिळवला आहे. यामुळे चीन अतिशय संतापला आहे. या भागातून आता चीनी सैनिकांच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोल्डो सैन्य तळ आणि स्पांगूर सरोवरावर भारतीय जवानांना पूर्णपणे नजर ठेवणे शक्य होणार आहे.

भारतीय सैनिक आता चीनी सैनिकांच्या कोणत्याही हालचाली अगदी सहजपणे पकडत आहेत आणि म्हणूनच चीनच्या अंगाचा तिळपापड होत आहे. या पूर्वी चीनच्या उंच भागांवर ताबा होता, मात्र भारतीय सैनिकांच्या कारवाईमुळे ही स्थिती बदलली आहे. युद्धजन्य स्थिती उद्भव्ल्यास आता भारतीय सैनिक केव्हाही मोल्डो सैनिकी तळ डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत उद्ध्वस्त करू शकणार आहेत. यामुळेच चीन संतापला आहे.कोणत्याही परिस्थितीत उंचीवर असलेल्या ठिकाणांवरून भारतीय सैनिकांना हटवले जावे यासाठी चीनचा आटापिटा सुरू आहे. ७ सप्टेंबरला देखील चीनी सैनिक भारताच्या भागात घुसखोरी करत होते आणि म्हणूनच त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय जवानांना हवेत गोळीबार करावा लागला

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like