भेंडी खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहे का ?? चला जाणून घेऊया भेंडीचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते. भेंडीचे हे आरोग्यदायी फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच भेंडीचा आहारात समावेश कराल.

आज आम्ही तुम्हाला भेंडी खाण्याचे काही खास फायदे सांगत आहोत

1) ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

2) भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए,बी,सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुध्दा आढळते.

3) भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्य़ामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. अर्धवट शिजवलेल्या भेंडीची भाजी मधुमेही खाल्ली तर त्यांना फायदा होतो.

4) मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

5) भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठीही भेंडी उपयुक्त आहे.

6) भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

7) मेंदूचं कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी त्यांना भेंडी खाऊ घालावी.

8) भेंडीमधील पेक्टिन या सोल्युबल फायबरमुळे रक्तातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होते.

9) भेंडीमध्ये पॉलिफिनोलसारखे अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. या घटकामधील क्वेर्सेटिनमुळे कोलेस्टोरॉलचे ऑक्सिडेशन होण्यापासून बचाव होतो आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे कमी होतात. तसेच हृदयविकाराचा त्रास कमी होतो.

10) भेंडीमध्ये इतर भाज्यांपेक्षा अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे कँसरच्या पेशींची वाढ करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होण्यास मदत होते.

11) त्याचबरोबर भेंडीमधील सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांच्या कँसरची शक्यता कमी होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like