‘मते कापणारी मंडळी’ एवढीच आता आंबेडकरवादी पक्षाची ओळख ; संजय राऊत यांची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेने विरोधात कंगना रणावतचे समर्थन केले होते.त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आंबेडकरी पक्ष्याला लक्ष्य केले आहे. राज्यातील आंबेडकरवादी पक्षांनी स्वत:चे हसू करून घेतले आहे की, ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ हीच त्यांची ओळख झाली आहे, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिचे समर्थन करणाऱ्या रामदास आठवले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना खडेबोल सुनावलं आहेत.

बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात.इथला आंबेडकरी पक्ष महाराष्ट्राला शिव्या देणाऱ्या कंगना नावाच्या नटीच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला विमानतळावर पोहोचला. ज्या आंबेडकरांनी मुंबई महाराष्ट्राचीच असे ठणकावून सांगितले, त्या मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या नटीच्या स्वागताला आंबेडकरी विचारांचा पक्ष पोहोचतो हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता रिपाई आणि इतर आंबेडकरवादी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like