मनमोहन सिंगांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे ; बाळासाहेब थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, पण त्यांचं सरकारवर कोणतंही नियंत्रण नसल्याने त्यांच्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याला काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर टीका केलीये.

डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की जेव्हा डॉ. मनमोहनसिंह बोलतात तेव्हा जग ऐकतं, त्यांच्याबदद्ल फडणवीसांनी अशा तऱ्हेचे बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं बाळासाहेब थोरत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी GDP नोंदवला, ज्यांच्या 10 वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर 7.5% राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचं प्रदर्शन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like