“माझी जात ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं,” देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझी जात ब्राह्मण असल्यामुळं मला टीकेचा धनी करा काही लोकांना असं वाटतंय मात्र मराठा समाजाला माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले आहेत असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं –

मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावं. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये, असं फडणवीस म्हणाले.

कांदा निर्यातबंदी लावणं चूक

कांदा निर्यातबंदी ज्याक्षणी झाली त्याक्षणी मी केंद्रीय मंत्री गोयल यांना फोन केला. निर्यातबंदीसाठी ही वेळ बरोबर नाही. त्यांनी याबाबत केंद्रानं एक मेकॅनिझम तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना निर्यातबंदी लावणं चूक आहे.याबाबत मी केंद्राला पत्र ही लिहिलं आहे असं फडणवीस म्हणाले

You might also like