मुंबईच्या नावे नकोसा विक्रम !! चक्क 8 वेळा पहिल्या सामन्यात नशिबी पराभवच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडिअन्स हा खर तर आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने तब्बल 4 वेळा आयपीएल चे विजेतेपद पटकावलं आहे. परंतु काल आयपीएलच्या पहिल्याच सामन्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघानं रोहितच्या मुंबई इंडियन्सला पाच विकेटने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे आयपीएलच्या हंगामाची मुंबईची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे. पण पहिल्या सामन्यात पराभव होण्याची मुंबईची ही काही पहिली वेळ नाही. आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची मुंबईची ही सलग आठवी वेळ आहे. 

आयपीएलमध्ये सलग आठ वेळा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम मुंबईच्या संघानं आपल्या नावावर नोंदवला आहे. २०१८ मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा मध्ये चेन्नईकडून पराभव झाला होता. २०१९ मध्ये दिल्ली तर २०१३ मधे आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१६ आणि २०१७ मधील हंगामात आपल्या सलामीच्या सामन्यात मुंबईला पुणे संघानं पराभवाचा धक्का दिला होता. २०१४ आणि २०१५ च्या हंगामात आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईला कोलकाता संघाने हरवलं होतं.

आत्तापर्यंत मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुंबईचा संघ नेहमीच आयपीएल स्पर्धेत वापसी करत असतो.सुरुवातीचे सामने हरले तरी मुंबईचा संघ अंतिम क्षणी मुसंडी मारत असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like