मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये,नाहीतर…..विश्व हिंदू परिषदेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता अन्य राज्यातून कंगणाला पाठींबा मिळत असून मुख्यमंत्र्यांवर टीका होताना दिसत आहे. अशातच अयोध्येतील संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, असं म्हटलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली आहे. जर ते आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच पण त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागेल, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे.

वाराणसीमध्ये उद्धव ठाकरे, कंगणा राणावत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भित्तीपत्रक लावण्यात आली आहे. त्या भित्तीपत्रकामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण दाखवण्यात आलं आहे. त्यात उद्धव ठाकरे कंगणाचं वस्त्रहरण करत असून कंगणाचं संरक्षण करताना कृष्ण म्हणून नरेंद्र मोदींना दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी अयोध्येत गेले नव्हते. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की आम्ही जाणार आहोत. मात्र कंगणाच्या वादामुळे संतांनी ठाकरेंना न येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like