Saturday, March 25, 2023

मुख्यमंत्र्यांची मुलाखत बालिश वाटते; नारायण राणेंची घणाघाती टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनुभवहीन आहेत, त्यांनी दिलेली मुलाखत ही भावनिक आणि बालिश वाटते अशी घणाघाती टीका राज्यसभेचे खासदार भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. महराष्ट्राच्या विकासासंदर्भात मुलाखतीत काहीही चर्चा झाली नाही. ही मुलाखत घरगुती मुलाखत होती, असेही नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेना नेते, शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. सामनाला दिलेल्या या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. CAA आमचा पाठींबा आहे मात्र NRC प्रक्रिया राज्यात राबविणार नाही असे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.