अकलूज प्रतिनिधी |शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर माढा मतदारसंघ देशाच्या दृष्टीक्षेपात आला. तर याच दरम्यान अकलूजच्या मोहिते पाटलांनी भाजपमध्ये पक्षांतर केल्याने सर्वांना धक्काच बसला. भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर मोहिते पाटलांना माढा जिंकण्याचे मोठे आव्हान होते. मात्र ही आव्हान मोहिते पाटलांनी एका माळशिरस तालुक्यावर पेलले आणि भाजपचा उमेदवार माढा मतदारसंघात निवडून आणला.
पार्थच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी : अजित पवार
मोहिते पाटलांची ताकद म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो ते म्हणजे अकलूज गाव. या गावात मोहिते पाटील म्हणतील त्याच व्यक्तीला येथील लोक अगदी डोळे झाकून मतदान करतात. या गावात मोहिते पाटलांची एवढी लोकप्रियता आहे. त्याच अकलूजमध्ये भाजपच्या उमेदवाराला १८हजार ४३५ एवढी मते पडली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना २ हजार ७३९ मतांवरच समाधान मानवे लागले. अर्थात भाजपच्या उमेदवाराला एकट्या अकलूज गावानेच १५ हजार ६९६ मतांचे मताधिक्य दिले आहे.
कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार
अकलूजमध्ये भाजपला एवढी मते पडण्याचे कारण म्हणजे मोहिते पाटलांचे बेतोड नियोजन आणि मतदारांवर एक हाती पकड. संघटनाच्या बळावरच मोहिते पाटलांनी हे सध्या गाठले आहे. तर अकलूजमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवार १०५१ मते पडली आहेत. एकंदरीतच भाजपचा उमेदवार विजयी बनवण्यासाठी अकलूजच्या मतांचा मोलाचा वाटा आहे.
महत्वाच्या बातम्या
विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा