…म्हणून मला वाटते की राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जे काही कारस्थान चालले आहे ते महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे आणि त्यासाठी फक्त राज ठाकरेच नव्हे तर ज्यांना ज्यांना या महाराष्ट्रावर प्रेम आहे त्या सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साद घातल्याचं दिसून येत आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात दोन प्रमुख नेते कायम राज्याच्या हितासाठी लढत राहिलेत, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार….शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेचा झेंडा घेऊन राष्ट्रीय स्तरावर उभे राहिले आहेत. राजकीय मतभेद असतील पण महाराष्ट्रावर जे संकट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच काय तर सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ते म्हणाले.तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नेते, जे मराठी जपण्याचं काम करतायेत, त्यांच्यामागे मराठी जनता उभी आहे. त्यांचा वापर करण्याचं काम त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे असं सांगत राऊत यांनी राज ठाकरेंबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.  

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं राऊत म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like