राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर , त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा – भाजप आमदारांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता.

आता त्यावर भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जहरी टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, याची माहिती जनतेपासून का लपवून ठेवली? या गृहमंत्र्यांचे आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दोन महिन्यात एक इंचही पुढे सरकता आलं नाही. त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं? असे सवाल देखील आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like