राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंनंतर खरे फायरब्रँड – अमेय खोपकरानी संजय राऊताना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. जर ठाकरे ब्रँड वाचला नाही तर त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” आणि भविष्यात राज ठाकरे यांनाही याचा फटका बसेल अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राऊत यांची ही भूमिका मनसे नेत्यांना पटलेली नाही. आधी संदीप देशपांडे त्यानंतर आता अमेय खोपकर यांनी राऊत यांना सुनावलं आहे.

यासंदर्भात अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हणले आहे की, शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे”

खोपकर म्हणाले, “सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like