Thursday, March 23, 2023

राम मंदिरासंबंधी घेण्यात आलेल्या मोदी सरकारच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचं निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही माहिती आज लोकसभेत दिली. ‘मंदिराबाबत आवश्यक ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य या ट्रस्टला असेल,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचे पालन करत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल मोदी सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विटरवरून मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन.

- Advertisement -