रोजच्या आहारातील आलं शरीरासाठी आहे खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊया आल्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक ठिकाणी आल्याचे उत्पन्न घेतले जाते. चहामध्ये आले मोठ्या प्रमाणात वापरता. तसेच त्याचा वापर हा अनेक पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. पदार्थाना चव तसेच सुगंध येण्यासाठी सुद्धा जास्त प्रमाणात आल्याचा वापर केला जातो. आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीबंधात सर्वत्र त्याची लागवड होते.

आले खरीप तसेच रब्बी हंगामात येते. याला पाण्याची फारशी गरज लागत नाही.परंतु चांगले उत्पादन येण्यासाठी एकाच जमिनीत सातत्याने आले न लावता जमीन आलटून,पालटून आल्याची शेती करावी.ले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते.सुंठीचे तेल काढतात. आले हे बऱ्याच काळ टिकवण्यासाठी ओल्या मातीत रुजवले जाते. महाराष्ट्र हे राज्य आल्याच्या उत्पन्नांत अग्रेसर आहे.

आल्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे
–आल्यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच पचनाचे अनेक त्रास जर होत असतील तर त्यावेळी आपण आल्याचा वापर करतो.
— अनेक लोकांना श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात जातो. त्यावेळी आले पाण्यात टाकून किंवा आल्याचा वास दिला जातो. त्यामुळे श्वसन विकार नष्ट होण्यास मदत होते.
— अनेक स्त्रियांना आपल्या मासिक दिनक्रमात अनेक अडचणी येतात. त्यावेळी आल्याचा काडा करून पिल्यास त्याचा फायदा अनेक स्त्रियांना होतो. तसेच अनेक स्त्री रोग नाहीसे होण्यास मदत होते.
— अनेक वेळा पोटात वेदना होतात. त्यावेळी कोरडे आले खाल्याने पोटातील वेदना बंद होतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like