वांग्याचे सदाहरित वाण उत्पादन देईल ४४० ते ४८० क्विंटल उत्पादन               

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उंच ठिकाणावरील काही क्षेत्रे सोडता  देशात अनेक ठिकाणी भाज्यांमध्ये वांग्याच्या सदाहरित वाणाचे पीक घेतले जाते. या शेतीमध्ये प्रगत वाणाची भूमिका महत्वपूर्ण असते. ज्याच्या साहाय्याने वर्षभर याची शेती करता येउ शकते. ज्यामुळे चवही बदलत नाही आणि उत्पादनही चांगले मिळते. या वाणाचे संशोधन बिहार कृषी विश्वविद्यालय यांनी २०१९ मध्ये केले होते. या वाणाची हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातही शेती करता येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वाणाचे पीक ४२ अंश तापमानात ही घेता येते. या वाणाचे नाव म्हणूनच सदाहरित वाण असे ठेवण्यात आले आहे.

देशातील एकूण भाजीपाला वापराच्या ९% भाजीचे उत्पादन हे बिहार राज्यात होते. वैज्ञानिकांनी शोधलेल्या नवीन वांग्याच्या वाणाचा रंग हिरवा आहे. एका वांग्याचे वजन साधारण ८५ ते ८८ ग्राम असते. या वाणाच्या एका झाडाला २३ ते २६ फळे लागतात. सध्या अस्तित्वात असणाऱ्या एकूण वाणांच्या तुलनेत या वाणाचे उत्पादन बरेच अधिक आहे. उन्हाळ्याच्या काळात याचे उत्पादन साधारण २७० क्विंटल प्रति हेक्टर घेता येऊ शकते.  तर हिवाळ्यात याचे उत्पादन ४४० ते ४८० क्विंटल प्रति हेक्टर घेता येते.

वैज्ञानिकांच्या मते वांग्याचे हे वाण सर्व क्षेत्रातील सर्व परिस्थितीमध्ये सक्षम आहे. या वाणाचे बियाणे देखील कमी आहेत आणि याची चवही इतर वाणांच्या तुलनेत अधिक चांगली आहे. तसेच हे वाण अँटीऑक्सीडेंटनी समृद्ध आहे. यातून शरीराला अतिरिक्त व्हिटॅमिन मिळू शकतात असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like