विराटच्या कामगिरीवर बोलताना गावस्करांनी अनुष्काबद्दल केलं ‘हे’ आक्षेपार्ह विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा तोल सुटला.विराट कोहलीच्या कामगिरी वर टीका करताना त्यांनी अनुष्का शर्मा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. गावसकारांनी केलेल्या त्या आक्षेपार्ह विधानामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावर नेटकरी गावसकारांना ट्रोल करत आहेत. अनुष्का आणि विराटबद्दल केलेल्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावसकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

वास्तविक, पंजाबविरोधातील सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. कोहलीने क्षेत्ररक्षणावेळी राहुलचे दोन झेल सोडले तर फलंदाजी करताना केवळ1 धाव काढून तो माघारी परतलाअपयशी ठरला. विराट कोहलीला आपल्या लौकिकास फलंदाजी करण्यात अपयश आलं. तो बाद होऊन माघारी परतताना भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. गावसकर म्हणाले की, Virat Kohli has only trained against Anushka’s balls during the lockdown

गावसकरांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चाहते चांगलेच भडकले आहेत. नेटकऱ्यांनी गावसकरांवर टीका केली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दारुण पराभव केला. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like