व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे आजार ; जाणून घेऊया व्हिटॅमिन बी चे महत्त्व

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या शरीरात एक जरी व्हिटॅमिन ची कमतरता निर्माण झाली तरी अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणत्याही जीवनसत्वाची कमतरता भासू नये अशी काळजी सर्वानी घेतली पाहिजे. आहारात यॊग्य घटकांचा समावेश केल्याने कोणत्याही शारीरिक आणि मानसिक त्रास निर्माण होत नाहीत. आज आपण व्हिटामिन बी म्हणजे काय त्याची कारणे काय आणि त्यावरील उपाय पाहणार आहोत.

व्हिटॅमिन बी म्हणजे थायामीन याची लक्षणे काय आहेत.

–व्हिटॅमिन बी मुळे आपल्या शरीराचे सर्व कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते.

— बेरीबेरी नावाचा रोग हा व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होतो. त्याचे दोन प्रकार आहेत. एक ड्राय बेरीबेरी आणि आद्र बेरीबेरी हे दोन प्रकार आहेत.

–कोरड्या बेरीबेरी मुळे मज्जारज्जूवर परिणाम होतो. रुग्णाला वेदना होतात. थकवा येतो. यामुळे बधिरपणा जाणवतो. आणि हातापायाला मुंग्या येतात.
हृदयाचे वाढते आकारमान श्वासोच्वास याची गती कमी होते. हातापायांना सूज येण्यास सुरुवात होते.

इतर लक्षणे —

 • रुग्ण अनिरोस्टीक होऊ शकतो.
  -वजन झपाट्याने कमी होते.
  -मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
  -वजन कमी होण्यास सुरुवात होते.
  -मज्ज्जारज्जूचे कायम स्वरूपी नुकसान होते.
  -कोमात जाणे असे गंभीर समस्या निर्माण होतात.
  -अचानक हृद्य बंद पडते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like