Sunday, March 26, 2023

शरद पवारांनी आम्हाला प्रेरणा दिली – हेमंत सोरेन

- Advertisement -

मुंबई : शरद पवार यांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली असं मत झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे होणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केले आहे. झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयाचे नायक झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी देखील सोरेन यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले. शरद पवार यांच्या अभिनंदनाला उत्तर देताना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आठवण करून देत शरद पवार यांनी आम्हाला प्रेरणा दिली असल्याचे मत हेमंत सोरेन यांनी व्यक्त केले आणि शरद पवारांचे आभार मानले. झारखंडच्या विजयाने भाजपाला पराभूत करण्यासाठी नव्या समीकरणांना अधोरेखित केले असल्याचे पवारांनी सांगितले. सोमवारी पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन झारखंडच्या जनतेचे आभार मानले होते.