Tuesday, June 6, 2023

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी शेतकरी प्रश्नांसाठी पाच संघटनांचे एकत्रिकरण करण्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.तसेच रघुनाथ दादा पाटील यांची शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड, आम आदमी पक्ष आणि प्रहार संघटना हे पाच जण विधानसभा निवडणुक एकत्रित लढवणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. या सोबतच सातारा लोकसभाही लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शेतकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्रिकरण करत असल्याची माहिती त्यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. तेव्हा त्यांना विधानसभा निवडणूकीत किती यश मिळते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.