Saturday, March 25, 2023

शेन वॉर्न बरोबर झालेला सामना मी कधीही विसरू शकत नाही- सचिन तेंडुलकर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या खेळामध्ये जवळपास २४ वर्षांचा कालावधी घालवला.आपल्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, मुरलीधरन यासारख्या मोठ्या गोलंदाजांचा सामना केला.पण सचिन तेंडुलकर म्हणतो की वॉर्नबरोबरचा त्याचा सामना तो कधीच विसरू शकत नाही.

अलीकडेच बीसीसीआयने सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात सचिनने वॉर्नबरोबरच्या त्याच्या चकमकींबद्दल भाष्य केले आहे.सचिन म्हणाला, “वॉर्नशी झालेला माझा सामना मी कधीच विसरू शकत नाही. त्याची सुरुवात १९९८ मध्ये झाली होती आणि त्यावेळी मी वॉर्नला राउंड द विकेट खेळण्याचा सराव केला होता. कारण त्यावेळी कोणीही त्याबाजूने त्याच्यावर हल्ला चढविला नव्हता.जर एखादा फलंदाज खराब चेंडूची वाट पाहत असेल तर गोलंदाज फक्त त्याच्याकडे डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करेल, परंतु वॉर्न विकेट घेण्यासाठी गोलंदाजी करीत असे. हे त्याचे सर्वात मोठे शस्त्र होते. “

- Advertisement -

तेंडुलकर पुढे म्हणाला की, “मला आठवते मुंबईतल्या सराव सामन्यात मी दुहेरी शतक झळकावले होते आणि त्यावेळी वॉर्नने एकही बॉल राउंड द विकेटने टाकलेला नव्हता. मग मी म्हणालो की जेव्हा तो राउंड द विकेट येईल तेव्हा ते सर्वात कठीण जाईल. दुसऱ्या डावात वॉर्नने राउंड द विकेट गोलंदाजी केली. मी त्याच्यासाठी खूपच सराव केला होता कारण आपण वेळ आल्यावर पाहून घेऊ असा विचार करून तुम्ही वर्ल्ड क्लास गोलंदाजासमोर जाऊ शकत नाही. माझ्या डोक्यात त्याला खेळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते ज्याचा मी सराव केलेला होता.

How is that no out! Shane Warne still upset over this delivery to ...

उल्लेखनीय म्हणजे वॉर्नने सर्व फॉर्मेटमध्ये सचिनला केवळ चारच वेळा (कसोटीत तीन वेळा आणि वनडेमध्ये एकदा) बाद केले आहे.या दरम्यान सचिनची सरासरी ५४.२५ इतकी होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.