Sunday, April 2, 2023

सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; संजय राऊत यांची माहिती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकस आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पुढील म्हणजे फेब्रुवारी महिन्यात या सरकारला १०० दिवस पूर्ण होतील.

सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, अशी माहिती राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा

  1. चीनचा ‘कोरोनाव्हायरस’ जगभर पसरतोय; आतापर्यंत घेतले ४०० बळी, काय आहे ‘कोरोनाव्हायरस’? जाणून घ्या
  2. थेट नगराध्यक्ष निवडीला महाविकास आघाडीचा ब्रेक; सरपंच, नगराध्यक्ष सदस्यांतून निवडणार
  3. महाराष्ट्रात १२ दिवसानंतर ‘तान्हाजी’ करमुक्त; आतापर्यंत २०० कोटींची कमाई