Tuesday, June 6, 2023

सोलापूर जिल्ह्यातील अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी इथं कालच्या जोरदार पावसामुळ अंगावर वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. पूजा महादेव हुगी असं या महिलेचं नाव आहे.

शेतमजुरी करणाऱ्या पूजा हुगी आणि इतर चार महिला या सोमनाथ निंबाळ यांच्या शेतात कामाला गेल्या होत्या. तेव्हा वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळं निवारा शोधण्याच्या तयारीत असलेल्या पूजाला कडाडणारी वीज स्पर्श करून गेली. अन पूजा जागेवरच कोसळली. व तिचा जागीच मृत्यू झाला.

तिच्या सोबत असणाऱ्या बाकीच्या महिलांनी आरडा-ओरड केल्यावर नागरिक तिथं जमा झाले. आणि त्यांनी पूजाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासल्या नंतर मृत घोषित केलं. पूजाला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. पती महादेव हुगी हे शेतमजुरी करतात. त्यामुळं त्यांच्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.