Sunday, June 4, 2023

‘३६ गुण’ जमले..

चंदेरी दुनिया । सातत्यानं वैविध्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये समित कक्कड यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘हुप्पा हुय्या’, ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’, ‘आश्चर्यचकीत’ यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे देणाऱ्या समितचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘३६ गुण’ असं या सिनेमाचं नाव असून हृषीकेश कोळीनं त्याचं लेखन केलंय. सिनेमात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांच्या मुख्य भूमिका असल्याचं कळतंय.

 

मुंबई आणि लंडनमधल्या तब्बल नव्वद लोकेशन्सवर हा सिनेमा चित्रीत झाला आहे.