अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीची ‘बहीणबीज’ भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यंदा दिवाळी भेट जाहिर करण्यात आली आहे. दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये ‘बहीणबीज’ (भाऊबीज) मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून हा लाभ सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी ही भेट अदा करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला असून, पुढील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.-

अंगणवाडी सेविका – ९७ हजार ४७५ ,
अंगणवाडी मदतनीस – ९७ हजार ४७५,
मिनी अंगणवाडी सेविका – १३ हजार ११,
एकूण – ०२ लाख ०७ हजार ९६१

Leave a Comment