अख्यायिका जेष्ठ गौरीची ….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#गणेशोउत्सव२०१९ | हिंदू देवशास्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्रिया महालक्षी गौरीकडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्याची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला. शरण आलेल्या पतींना व पृथ्वीतलावरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने सौभाग्य प्राप्त झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तेव्हापासून सर्व स्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

गौरीपूजन

गौरीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते. सकाळी पूजा आरती करून गौरीला सर्व गोडधोड पदार्थाचा नैवद्य दाखवला जातो. गौरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. तसेच गौरी घरात आल्यानंतर एक संकेत मात्र पाळला जातो. तो असा की जोपर्यंत गौरी घरात आहेत. तोपर्यंत आपल्या घरातील पैसे नागरिक कोणाला देत नाहीत. म्हणजेच पैशांचे कोणतेच व्यवहार केले जात नाहीत.

शंकरोबा 

गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी घरात शंकरोबा घेतला जातो. गौरीला ज्याप्रमाणे तेरड्यांची पाने आणि चाफा असतो. त्याचप्रमाणे शंकरोबालाही विशिष्ट पांढऱ्या रंगाची फुले असणारी रोपे घरात ठेवली जातात. शंकरोबा हा मुलाने घरात आणायचा असतो. शंकर, गणपती आणि गौरींचे मुखवटे या तिघांची सुंदर आरस केली जाते. घरोघरी सुपात विड्याची पाने ठेऊन ‘ओवसा’ भरला जातो आणि सुख समृद्धीसाठी देवीकडे प्रार्थना केली जाते.

जेष्ठ गौरीची अख्यायीला 

हिंदू देवशास्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्रिया महालक्षी गौरीकडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्याची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला. शरण आलेल्या पतींना व पृथ्वीतलावरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने सौभाग्य प्राप्त झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तेव्हापासून सर्व स्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

गौरी विसर्जन 

तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. त्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. गौरीचा चेहरा हा जसा अवाहनानंतर आणि पूजनादिवशी तेजस्वी असतो. तो तिसऱ्या दिवशी उदास दिसतो. त्यानंतर पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो.

गौरी पाण्यात विसर्जन केल्यानंतर परत निघताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर आणि परसातल्या झाडावर टाकतात. त्यामुळे घरात समृद्धी नांदते आणि झाडाझुडपांचे किटाणूंपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.

Leave a Comment