अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते उद्धाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे | अमित येवले

धुळे येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्धाटन झाले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयालगतच्या मैदानावर हे शिबिर भरवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्यालगत असलेले अमळनेर, पारोळा, मालेगांव, सटाणा या तालुक्यातीलही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ होणार आहे. अटल महाआरोग्य शिबीर हे एक दिवसाचे विनामूल्य शिबीर असले तरी यामध्ये ज्या रुग्णांवर छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील त्यांच्यासाठी पुढील चार महिने ह्या शिबीराची टिम पाठपुरावा करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी कटिबध्द असणार आहे.

यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन , पर्यटनमंत्री जयकुमार रावळ , खासदार हिना गावित, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार अनिल गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

अटल महाआरोग्य शिबिरात ह्या होणार तपासण्या व शस्त्रक्रिया

नेत्र, अस्थिव्यंग, हृदयरोग, मेंदू रोग, शस्त्रक्रिया, मूत्र रोग, प्लास्टिक सर्जरी, कान- नाक- घसा, स्त्री रोग, कर्करोग, दंतरोग, श्वसन विकार, क्षयरोग, ग्रंथीचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, त्वचा व गुप्तरोग, जेनेटिक विकार आदी विकारांवरील तपासणी करुन औषधोपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, एक्स- रे, सोनोग्राफी, इएमजी, इसीजी, 2- डी इको, इइजी, मॅमोग्राफी (स्तनाच्या कॅन्सरची तपासणी), पी. एफ. टी. तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

 

Leave a Comment