मुंबई प्रतिनिधी | सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ झाली आहे. ३८ हजारचा टप्पा सोन्याने ओलांडला आहे ३८४७० रुपयावर तो काल स्थिर झाला. आज पर्यंतचा सर्वात मोठा दर म्हणून ह्या कडे पहिले जातेय. दर वाढीला बरीच कारण आहेत. नुकताच झालेला अर्थ संकल्पात त्याच्यावरील दोन टक्के कर वाढवला आहे.
‘ऑल इंडिया सराफ असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या भावात पन्नास रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने प्रति दहा ग्रॅमचा भाव ३८,४७० रुपयांवर पोहोचला. न्यूयॉर्क येथील बाजारपेठेत सोमवारी सोन्याचा प्रति औंस भाव १५०३.३० डॉलरवर गेला. सणासुदीच्या दिवसात १० ग्रॅमसाठी ४०,००० रुपये पर्यंत सोन्याचा भाव जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्यात गुंतवणूक करण्याकडं भर दिला जात आहे. पुढील महिन्यात भारतात सणांची रेलचेल असेल त्यामुळं स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढणार आहे, अशी माहिती ‘पीपी’ ज्वेलर्सचे अध्यक्ष पवन गुप्ता यांनी दिली.