अमरावती नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी अमरावती |अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी नजीक नागपूर-अमरावती एसटी बस उलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काल रात्री 9 वाजता मोझरीतील हॉटेल साईकृपा जवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एम एच ४० वाय ५२६६ क्रमांकाच्या एसटी बस समोर अचानकपणे गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात बस अनियंत्रित होऊन महामार्गावरून रोडच्या खाली खड्डयात उलटली. बस मध्ये एकूण ४६ प्रवाशी होते. जखमी झालेल्यांपैकी पुंडलिक नारायण सोलनके रा. तळेगाव शामजीपंत, मधूकर वामनराव अटाळकर रा.आसेगाव पूर्णा याना जवळच्या तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून चार अन्य जणांना मोझरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर,नगराध्यक्ष वैभव वानखडे, पांडुरंग मक्रमपुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. बस पलटी झाल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

|

 

 

 

 

 

 

 

 

\|

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

\

Leave a Comment