वॉशिंग्टन | पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणारा निरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांचा तपास ईडी आणि सीबीआय करत आहेत. निरव मोदी हाँगकाँग मध्ये आणि मेहुल चोकसी वॉशिंग्टनमध्ये असल्याचे तपासातून पुढे आले होते. भारत अमेरिका हस्तांतरण करार १९९९ नुसार इंटरपोल द्वारे मेहुल चोकसीला हस्तांतरित करण्याची नोटीस भारताने पाठवली होती. त्यावर अमेरिकेने आज उत्तर दिले आहे. मेहुल चोकसीला आम्ही अमेरिकेत शोधण्याचा प्रयत्न केला परंतु भारताची नोटीस पोचण्या अगोदरच मेहुल चोकसीअमेरीकेतून पसार झाल्याची कबुली अमेरिकेने दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निरव मोदी आणि मेहुल चोकसी याने १३,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. या अफरा तफरीत निरव मोदी आणि मेहुल चोकसी यांना अटकेची तलवार उभा राहिली होती. अशातच दोघेही हातावर तुरी ठेवून पसार झाले होते.
इंटरपोलने मेहुल चोकसीच्या बाबतीत हात वर केल्याने निरव मोदी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. या तयारीला या प्रसंगाने आणखी बळ मिळाले आहे.